अक्कलकोट : प्रतिनिधी
शिक्षक हा नेहमीच अध्ययन व अध्यापन करीत असतो.तो सेवेतून निवृत्त झाला असला तरी शिक्षकाला माजी शिक्षक म्हणता येत नाही, असा सूर पत्रकार संघाच्या कार्यक्रमात बोलताना विविध मान्यवरांनी व्यक्त केला. नागनाथ प्रशाला कुरनूर (ता.अक्कलकोट) येथील शिक्षक सुरेश माने हे ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले.किणी येथील ज्येष्ठ शिक्षक शंकर व्हनमाने यांची नागणसूर येथील उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती झाली तसेच हंजगीचे यशवंत पाटील यांची आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाल्याबद्दल पत्रकार संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
त्यांचा सत्कार ज्येष्ठ पत्रकार बाबा निंबाळकर , शिवलाल राठोड व अन्य पत्रकारांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.शिक्षक हा नेहमीच समाजात अध्ययन करीत असतो. अध्यापन सेवेतून निवृत्त होत असले तरी शिक्षक हा विद्यार्थी व नेहमी गुरुच असतो.सुरेश माने हे विद्यार्थी प्रिय, आदर्श शिक्षक आहेत. ते पुस्तकी ज्ञानाबरोबरच उत्तम संस्कार केले. सुसंस्कृत विद्यार्थी , आदर्श विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न केला, असा सूर मनोगतातून व्यक्त करण्यात आला.यांनी सांगितले. मनमिळावू ,नम्रता, सहकार्याची भावना यामुळे तिघांनी आपापल्या ठिकाणी यशस्वीरित्या काम करून ठसा उमटविला. त्यांना उर्वरित आयुष्य निरोगी लाभो, अशी सदिच्छा सर्व पत्रकारांनी व्यक्त केली.उपस्थित सर्व मान्यवरांनी सुरेश माने,शंकर व्हनमाने,यशवंत पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले.यावेळी ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रवीकुमार धनशेट्टी, सुभाष बिराजदार, स्वामीराव गायकवाड, सोमशेखर जमशेट्टी, अभिजीत पत्की, राजेश जगताप, चेतन जाधव, नंदकुमार जगदाळे,महादेव जंबगी, रियाज सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार राजशेखर विजापूरे यांनी मानले.