(सचिन पवार )
कुरनूर,दि.१८ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे मोरया प्रतिष्ठानच्यावतीने एकदिवसीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन माजी सरपंच अमर पाटील यांच्या हस्ते होऊन स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेत एकूण ११ संघ सहभागी झाले होते. त्यापैकी सहा संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केले होते. पहिल्या क्रमांकाच्या बक्षिसासाठी सी एम बॉईज विरुद्ध मोरया गणेश मंडळ असा सामना रंगला असताना सी एम बॉईज संघाने एकहाती सामना फिरवत संघाला विजेतेपद मिळवून दिले.तर मोरया गणेश मंडळाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तर तिसऱ्या क्रमांकचे बक्षीस सिद्धनाथ कबड्डी संघाला मिळाले. या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस ७ हजार ७७७ माजी सरपंच अमर पाटील यांच्याकडून तर ५ हजार ५५५ द्वितीय बक्षीस भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले अभिजीत कोळी तर तृतीय बक्षीस ३ हजार ३३३ अमर प्रेमी युवा मंच अध्यक्ष गोविंद येवते यांच्याकडून ठेवण्यात आले आहे.या सामन्यांमध्ये पंच म्हणून राम शिंगटे, दिगंबर जगताप, आदेश सुरवसे, ब्यागेहळ्ळीचे श्रीशैल हे होते.तर सामने व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रमोद खांडेकर, छत्रगुण शिंगटे, शुभम चेंडके आदींनी परिश्रम घेतले.