ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘दादांच्या ताफ्यात कराडची गाडी…’ ; बीडच्या खासदारांचा धक्कादायक आरोप !

बीड : वृत्तसंस्था

राज्यात सर्वत्र बीडचे वाल्मिक कराड यांची चर्चा सुरु असतांना नुकतेच बीडचे शरद पवार गटाचे खा.बजरंग सोनावणे यांनी एक धक्कादायक आरोप केल्याने राज्यात पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली आहे.

खा.बजरंग सोनावणे म्हणाले कि, अजित पवार मस्साजोगला संतोष देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यात आरोपी वाल्मिक कराडची गाडी सुद्धा होती असा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे.

पुढे ते असेही म्हणाले की, ज्या दिवशी अजित पवार शनिवारी 16 तारेखला मस्साजोग येथे आले, त्यांच्या ताफ्यामध्ये कराडची गाडी होती. त्या गाडीत हा आरोपी होता, तो तिथे जाऊन सरेंडर होतो. याचा अर्थ काय? ताफ्यामधील आरोपी तिथे जाऊन सरेंडर होतो. मस्साजोगला ही गाडी होती. त्याच गाडीमधील आरोपी जाऊन शरणगती देतोय. गाडी कोणाच्या नावावर आहे? असा सवालही बजरंग सोनावणे यांनी केला. इतकंच नाहीतर परळीतून पुणे त्यानंतर गोवा आणि पुन्हा पुणे असा वाल्मिक कराडचा प्रवास सुरु असताना पोलीस काय करत होते? असा सवाल बजरंग सोनावणे यांनी विचारला आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मोठा दावा केला आहे. १५ तारखेला शपथविधी सोहळ्याला आरोपी वाल्मिक कराड नागपूरमध्ये हजर असल्याचे म्हणत असा आरोपही बजरंग सोनावणे यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!