ध्यास विश्वसार्ह बातमीचा

काशिनाथ भरमशेट्टी यांचे कार्य कधीही विसरता येणार नाही; हन्नूर येथील कार्यक्रमात ११४ जणांचे रक्तदान

 


अक्कलकोट, दि.६ : स्वामी समर्थ
साखर कारखान्याचे उपाध्यक्ष स्व.काशिनाथ भरमशेट्टी हे एक कार्यशील,कृतिशील आणि ध्येयवादी नेते होते.त्यांच्यामुळे या भागात विकासाची गंगा आली.त्यांचे कार्य या भागातील जनतेला कधीही विसरता येणार नाही.त्यांचे अधुरे कार्य पुढे नेणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल आणि हे काम आता के.बी प्रतिष्ठान करेल,असा आशावाद स्वामी समर्थ कारखान्याचे अध्यक्ष संजीवकुमार पाटील यांनी व्यक्त केला.शनिवारी,हन्नूर (ता.अक्कलकोट) येथे भरमशेट्टी यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त के.बी.प्रतिष्ठान व भरमशेट्टी परिवाराच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सदस्य तुकाराम बिराजदार होते.व्यासपीठावर माजी उपसभापती सिध्दार्थ गायकवाड,सागर दर्गोपाटील,अशपाक अगसापुरे,व्यंकट मोरे,राजू चव्हाण,इरसंगप्पा गड्डे,राजकुमार पाटील,सिध्दाराम भंडारकवठे,बसवराज बाणेगांव,संजय बाणेगाव,राहुल बिराजदार,हेमंत हंडगे,अजय सगट,रेवणसिध्द
बिराजदार,मोहन चव्हाण आदींची उपस्थिती होती.प्रारंभी प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.प्रतिष्ठानचे आधारस्तंभ विश्वनाथ भरमशेट्टी,
राजकुमार भरमशेट्टी व क्रांती दर्गो पाटील- भरमशेट्टी,डॉ.नेहा येळापुरे -भरमशेट्टी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.या कार्यक्रमात कुरनूरचे सरपंच व्यंकट मोरे,बाळासाहेब मोरे,सिद्धाराम भंडारकवठे आदींनी भरमशेट्टी यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.यानिमित्त महादेव मंदिर येथे अश्विनी ब्लड बँक कुंभारी व सोलापूर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या
शिबीरात ११४ जणांनी रक्तदान केले.होते.नोबल हॉस्पिटलचे चेअरमन डॉ.अमजद सय्यद व डॉ.बसवराज सुतार
यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने ४२ जणांची मोफत ईसीजी व १४२ जणांची रक्ततातील कोलेस्ट्रॉलची
तपासणी केली.यावेळी सहभागी रक्तदात्यांना के.बी.प्रतिष्ठानकडून प्रवाशी बॅग देण्यात येणार आली.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव भरमशेट्टी,उपाध्यक्ष रमेश छत्रे,सचिव गौरीशंकर भरमशेट्टी,ऍड.विशाल
भरमशेट्टी,राजकुमार भरमशेट्टी,शीतल भरमशेट्टी,बसवणप्पा सुतार,संतोष बाळशंकर,युवराज बाळशंकर,
योगीराज भरमशेट्टी,शब्बीर मुल्ला,सचिन बिडवे,चंद्रकांत जंगले,नरेंद्र जंगले,गौतम बाळशंकर ,निरंजन हेगडे,परशुराम
बाळशंकर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी के.बी प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी प्रयत्न केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!