नागपूर : वृत्तसंस्था
देशातील काही राज्यात भाजपने मोठा विजय मिळविला आहे, यावरून राज्यातील ठाकरे गट व भाजपमध्ये राजकारण तापले असतांना ठाकरे गटाचे नेते खा.संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान मोदींवर टीका केल्याने आता हि टीका त्यांच्या अंगलट आल्यचे चित्र दिसू लागले आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर पलटवार करताना म्हणाले होते कि, देशाचे पंतप्रधानपद ही एक व्यक्ती नव्हे तर ती संस्था आहे, तसेच सत्ताधाऱ्यांना जेवढी चौकशी करायची आहे ती त्यांनी करावी, एक वेळ अशी येईल की आम्ही तुम्हाला बांबू लावू असा हल्ला राऊतांनी केला आहे. तसेच मोदींच्या विषयी नेहमीच आदराची भावना आहे. त्यांच्यावरील टीका ही व्यक्तिगत स्वरूपाची नसून राजकीय स्वरूपाची असते असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळच्या उमरखेड पोलिस ठाण्यात भाजपचे नेते, जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी तक्रार दिली होती. सामना या वृत्तपत्रातून देशविरोधी व्यक्तव्य करून देशद्रोहाचा गुन्हा करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी केल्याचा आरोप करत नितीन भुतडा यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून कलम 153 (A), 505(2) आणि 124 – A नुसार राऊतांवर गुन्हा दाखल झाला आहे. यावरच राऊतांनी प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले, ”दोन दिवसांपूर्वी पंडित नेहरूवर टीका केली गेली आहे. या देशात आणीबाणी लावलेली नाही. टीका टिपण्णी होत राहणार आहे. राजकीय भूमिकांवर टीका करत असतील आणि त्यावर गुन्हे दाखल करून दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर हा आणीबाणीचा लढा या विरोधातच होता. आमची टीका राजकीय भूमिकेच्या विरोधात असते, असे संजय राऊत म्हणालेत.