बीड : वृत्तसंस्था
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या मोठ्या प्रमाणात व्हिडीओ व्हायरल होत असतांना आता ‘खोक्या’च्या घरावर वनविभागाने मोठी कारवाई केल्यानंतर त्याची बहिण चांगलीच आक्रमक झाली आहे. सतीश भोसले हा माझा भाऊ आहे. आतापर्यंत या प्रकरणात परिवार कधीच बोलला नाही. मात्र आता आमचे घर पाडण्यात आले. इतकेच नाही तर ते घर पेटवून देखील देण्यात आले. यावेळी आमच्या घरातील लहान मुलींना देखील मारहाण करण्यात आली. आता त्यांच्यावर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात सरकारने आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याची बहिणीने केली आहे. त्यांनी समोर येत प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचा दावा सतीश भोसले यांच्यावर करण्यात येत आहे. इतकेच नाही तर मारहाण करतानाचे त्याचवे काही व्हिडिओ देखील समोर येत आहेत. त्यामुळे आता त्याचे घर देखील पाडण्यात आले. वन विभागांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. तसेच चार ते पाच दिवसांनी हे घर देखील पेटवून देण्यात आले आहे. आता त्याच्या कुटुंबाला मारहाण झाली असल्याचा आरोपही होत आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळत आहे.
वन खात्याच्या जागेत अनधिकृत उभारण्यात आलेल्या घरावर वन विभागाने त्यावर बुलडोझर चालवण्यात आले होते. त्यानंतर ते पटवून देखील देण्यात आले. त्यानंतर सतीश भोसले याच्या बहिणीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सतीश भोसले याच्यावर जी कारवाई व्हावी, ती कायद्यानुसार करावी. मात्र आमचे घर पाडणाऱ्यांवर देखील सरकारने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सरकारने आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली आहे.
सतीश भोसले याला घेऊन बीड पोलिस महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. प्रयागराजहून त्याला छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात आले आणि तिथून त्याला बीडच्या शिरूर कासार येथे नेण्यात आले आहे. तिथे त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यानंतर सतीश भोसले याला 20 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या दरम्यान आता त्याच्याव वकिलांनी अनेक मोठे दावे केले आहेत.