तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट,दि.९ : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादाप्रमाणे यंदाही कोजागरी पौर्णिमा मोठ्या भक्तीभावाने आणि अपार श्रध्देने साजरी झाली.यानिमित्त हजारो भाविकांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.
सायंकाळी ७ वाजता देवीच्या गर्भदेवालयाचे विधीवत पुजा करुन द्वार उघडण्यात आले. यानंतर पुरोहित मंदार पुजारी व स्थानिक ब्रम्हवृंदांच्या मंत्रोच्चारात मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते विधिवत लघुरुद्र करुन देवीस महानैवेद्य व कोजागरी पौर्णिमेस विशेष मान असणारे मसाला दुध प्रसाद म्ह्णून दाखविण्यात आला. यानंतर मंदिर समितीच्या वतीने इंगळे यांच्या हस्ते दुध प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. हजारो स्वामी भक्तांनी याप्रसंगी या दुध प्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, उज्वलाताई सरदेशमुख, गिरीश पवार, सागर गोंडाळ, प्रसाद सोनार, विश्वास शिंदे, संतोष जाधव-फुटाणे, श्रीशैल गवंडी, संजय पवार, स्वामीनाथ लोणारी आदिंसह हजारो भाविक उपस्थित होते.
मंदिर समितीचे नेटके नियोजन
ज्या पद्धतीने तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी रविवारी हजारो भाविकांनी तुळजापूर मध्ये गर्दी केली होती. त्याच पद्धतीने या पौर्णिमेला देखील राज्यभरातील भाविकांनी स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. यासाठी मंदिर समितीने नेटके नियोजन केले होते.