कोल्हापूर: कोरोना सारख्या परिस्थिती राज्यात भ्रष्ट्राचार झाला असे आरोप भाजपकडून करण्यात आले आहे. आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोरोना काळात भ्रष्ट्राचार झाल्याचे आरोप केले. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात करोना साहित्याची ८८ कोटींची खरेदी करण्यात आली. चढ्या दराने सर्वच साहित्य खरेदी करण्यात आली. या खरेदीत ३५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप मंगळवारी भाजपने पत्रकार परिषदेत केला. या गैरव्यवहारावर लेखापरीक्षनात गंभीर ताशेरे ओढले आहेत. राजकीय वरदहस्ताने हा घोटाळा झाला आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यातील करोना साहित्यातील घोटाळा प्रकरण सातत्याने गाजत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही या घोटाळ्याची चौकशी होण्याची मागणी केली आहे. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन करोना साहित्यातील घोटाळ्यासंदर्भातील सविस्तर तपशील प्रसार माध्यमांसमोर मांडला केला. यावेळी किसान सभेचे अध्यक्ष भगवान काटेही उपस्थित होते.