अक्कलकोट, दि.२४ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील श्री दत्त मंदिराच्या प्रांगणात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात पार पडला.या सोहळ्याने भाविकांचे लक्ष वेधले. श्री दत्त मंदिर समिती व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.प्रारंभी सायंकाळी ६ वाजता अक्कलकोट येथील समाधी मठाचे पुजारी वेदमूर्ती आणणू महाराज यांच्या हस्ते अध्यायाला प्रारंभ
करण्यात आला.रामायणातील एकूण सात अध्याय वाचण्यात आले.
यावेळी निलंगा,दिंडेगाव,मोट्याळ,कोळेकरवाडी,हसापूर, बावकरवाडी परिसरातील वाचक, प्रवचक सहभागी झाले होते.प्रवचकांच्या सुमधुर वाणीने भाविक रामायणातील प्रसंगाने मंत्रमुग्ध झाले.सायंकाळी ६ ते सकाळी
साडे सहा पर्यंत भावार्थ रामायण युद्धकांड मधील अध्याय ४३ ते ४९ याचे वाचन आणि प्रवचन करून हा शक्ती सोहळा पार पडला.लक्ष्मणासाठी बजरंग बली
हनुमानाने वनस्पतीसाठी अख्खा डोंगर आणण्याचा पराक्रम केला होता.तो प्रसंग हुबे हुब दाखवण्यात आला.याची देही याची डोळा हा प्रसंग पाहून भाविकांनी समाधान व्यक्त केले.व्यासपीठ अधिकारी म्हणून ह.भ.प
बाबुराव शिंदे व परशुराम बेडगे यांनी काम पाहिले.या सोहळ्याला दुधनी बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे,सरपंच व्यंकट मोरे यांनी हजेरी लावली.यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष मारुती बावडे,तंटामुक्त अध्यक्ष
केशव मोरे,भागवत पोतदार,अशोक काळे,
तुकाराम जावीर,नारायण चेंडके,सुरेश बिराजदार,गोपीनाथ निंबाळकर, नागनाथ मोरे,राजू पोतदार,दिलीप पोतदार,धोंडिबा धुमाळ,भीम कुंभार, रवी सलगरे,लक्ष्मण
सुरवसे, आप्पा मुरूमकर,अप्पू काळे,रामा खांडेकर,तानाजी शिंदे यांच्यासह कुरनूर व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाविकांना
महाप्रसाद वाटप
मंदिर समिती व ग्रामस्थांच्यावतीने सर्व भाविकांना महाप्रसादाची सोय करण्यात आली होती.याला महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाला.तब्बल २८ वर्षांनंतर असा कार्यक्रम गावात झाल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केला.