अक्कलकोट,दि.२० : संपूर्ण तालुक्यात लक्षवेधी ठरलेल्या कुरनूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी व्यंकट मोरे यांची तर उपसरपंचपदी नौशाद तांबोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडीनंतर सरपंच मोरे यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एफ.एम शेख,तलाठी गोपाळ घाटे,ग्रामसेवक रेखा बिराजदार यांनी यांनी काम पाहिले.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत युवा नेते व्यंकट मोरे यांच्या पॅनेलने
अकरा पैकी आठ जागा जिंकून वर्चस्व सिद्ध केले होते.चौरंगी लढतीत मोरे यांच्या पॅनलने बाजी मारली होती.
सलग दुसऱ्यांदा मोरे गटाने विजय मिळवून ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्राप्त केले आहे.यावेळी नूतन ग्रामपंचायतसदस्य माजी सरपंच वत्सलाबाई मोरे,लक्ष्मी शिंगटे,रुकसाना मुजावर, चेतन मोरे,रेश्मा शिंदे,रमेश पोतदार , राजु गवळी, नौशाद तांबोळी,व्यंकट मोरे,सुनंदा शिंदे,अलका सुरवसे हे उपस्थित होते. निवडीनंतर नूतन ग्रामपंचायत सदस्य व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.निवडीनंतर बोलताना नूतन सरपंच मोरे यांनी गावचा चौफेर विकास साधून गावाला आदर्श बनविणार असल्याचे सांगितले.यावेळी तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष केशव मोरे,विद्यमान अध्यक्ष आयुब तांबोळी,औदुंबर बंडगर, लक्ष्मण शिंगटे, स्वामीराव सुरवसे, अमर मोरे, संभाजी बेडगे, शिवाजी बेडगे, बंडू बेडगे, सुरेश बिराजदार,तानाजी शिंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.