---Advertisement---

सिन्नुरच्या सरपंचपदी कल्पना सोनकांबळे तर उपसरपंचपदी प्रकाश कळसगोंड यांची निवड

Follow Us:
---Advertisement---

गुरुराज माशाळ

दुधनी दि. २६ : अक्कलकोट तालुक्यातील सिन्नुरच्या ग्राम पंचायत सरपंचपदी सौ. कल्पना सोनकांबळे तर उपसरपंचपदी प्रकाश कळसगोंड यांची निवड निवड करण्यात आली.

निवड्णुक निर्णय अधिकारी म्हणुन प्रभाकर घायाळ व ग्रामविकास अधिकरी सादीक वळसंगकर यांनी काम पाहिले. या संदर्भात ग्रामपंचायत कार्यालयात आज शुक्रवार रोजी सभा आयोजित करण्यात आले होते. होते. यावेळी नवनिर्वाचीत सद्स्य कल्पना सोनकांबळे, जगदिश उजनी, कुलसुमबी पाटील, शहकिर मुल्ला, निंगराज हौदे, रुस्तुमखा पठाण, अंबाबाई गायक्वाड, प्रकाश कळसगोंड, राचम्मा पुजारी उपस्थीत होते.

 

सकाळी दहा ते १२ वाजेपर्यंत सरपंच व उपसरपंच पदासाठी नामनिर्देशन पत्र भरण्यात आले. सरपंच पदासाठी कल्पना सोनकांबळे यांचे एकमेवा अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपसरपंचपदासाठी कुलसुमबी पाटील व प्रकाश कळसगोंड यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. यासाठी हात उंचावुन मतदान घेण्यात आले. कुलसुमबी पाटील यांनी तीन मते तर प्रकाश कळसगोंड यांना सहा मते मिळाल्याने प्रकाश कळसगोंड यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचे घोषणा निवडणुक निर्णय अधिकारी प्रभाकर घायाळ यांनी घोषीत केले.  सरपंच व उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायतीच्यावतीने सत्कार करण्यात आले. यावेळी शिवपुत्र जेवरगी, दौलप्पा कोटनुर, महिबुब मुल्ला, निलव्वाबाई उपस्थीत होते.

 

वरील प्रमाणे सभेचे कामकाज शांततेत पारपड्ल्याचे सांगुन उप्स्थितांचे आभार मानुन सभा संपल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी प्रभाकर घायाळ यांनी जाहिर केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!