ध्यास विश्वसार्ह बातमीचा

यंदा लाडक्या बहिणींना 2100 रुपये नाहीत

भाजप नेत्याने केलं स्पष्ट

मुंबई वृत्तसंस्था 

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणांना 2100 रुपये कधी पासून मिळणार याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली आहे.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देणार हे आश्वासन देण्यात आले होते. ते आश्वासन आम्ही पूर्ण करु. हे आश्वासन पूर्ण केले नाही तर आमची प्रतिमा देशाभरात खराब होईल. निवडणुका झाल्या की, आम्ही आश्वासन पूर्ण करत नाहीत, अशी आमची प्रतिमा होईल. मी याबाबत मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिणार आहे. आपण शब्दावर ठाम राहायला हवे. मी महायुतीच्या जाहीरनामा समितीचा अध्यक्ष होतो. त्यामुळे आम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण करणार आहोत. ती आश्वासन धुळीस मिळू देणार नाहीत. आमच्या महायुतीमध्ये सरकारमध्ये लाडक्या बहिणांना 2100 रुपये देण्याची क्षमता आहे.

महायुतीतील एकही पक्ष आमच्या 2100 रुपये देण्याच्या योजनेला विरोध करणार नाही. जानेवारी की जुलै किंवा कोणत्या महिन्यापासून 1500 रुपयांमध्ये वाढ करुन 2100 रुपये देण्यास सुरुवात करायची याबाबत चर्चा करण्यात येईल. आम्ही गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना सुरु केली होती. त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!