ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ललित पंचमी अक्कलकोटसह संपूर्ण राज्यभरात साजरी होणार

समर्थ नगरी परिवाराचा उपक्रम

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अक्कलकोटसह राज्यभरामध्ये ललिता पंचमी ,श्री स्वामी समर्थांचा अक्कलकोट नगरीतील आगमन दिवस समर्थ नगरी परिवाराच्या माध्यमातून एकत्रित नामस्मरणामध्ये साजरा होत आहे.त्यानिमित्त सोमवार दि.७ ऑक्टोबर रोजी सायं ५ वाजून २५ मिनिटांनी एकाच दिवशी एकाच वेळेस हा कार्यक्रम होणार आहे.अक्कलकोट येथील लोकापूरे मल्टीपर्पज हॉल येथे याचे आयोजन करण्यात आले आहे. शहर व तालुक्यातील सर्व स्वामी भक्तांनी या सोहळ्यात सहभागी होऊन स्वामी चरणी आपली सेवा अर्पण करावी, असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष ओंकार पाठक यांनी केले आहे.

समर्थ नगरी परिवार अक्कलकोटच्या वतीने मागील दोन वर्षापासून श्री स्वामी समर्थांचा अक्कलकोट येथील आगमन  दिन हा राज्यभरामध्ये एकत्रित सामूहिक नामस्मरणामध्ये इच्छापूर्ती दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.सलग तिसऱ्या वर्षी देखील हा उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणामध्ये अक्कलकोटसह राज्यभरामध्ये संपन्न होत आहे.

याकरिता संस्थापक अध्यक्ष सैदप्पा इंगळे व कार्याध्यक्ष ओंकार पाठक यांनी राज्यभरामध्ये दौरे करून स्वामीनाम प्रसाराची सेवा केली आहे.ललिता पंचमी या दिवसाचे महत्त्व व स्वामींच्या महिमा याविषयी मार्गदर्शन केले.श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे व श्री स्वामीभक्त चोळप्पा महाराज यांचे वंशज वे .शा सं . अण्णू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा राज्यभरामध्ये संपन्न होणार आहे. यंदा हा सोहळा मंगेवाडी – सांगोला , बार्शी , सोलापूर शहर ,दक्षिण सोलापूर , मिरज , इचलकरंजी , तासगाव , कोल्हापूर चांदेकरवाडी कोल्हापूर जिल्हा देवगड – हडपीड , रत्नागिरी ,पनवेल , ठाणे ,पालघर , बोरिवली , दादर , पुणे – कात्रज – गणेश नगर ,डेक्कन – हडपसर – पिंपरी ,नाशिक ,औरंगाबाद , नांदेड ,इंदापूर – वल्लभनगर ,लातूर , नळदुर्ग , नागपूर ,चंद्रपूर , कर्नाटकातील चिकोडी – बेळगाव ,सत्तारी – गोवा व राजस्थान आदिसह बहुतांश ठिकाणी हा सोहळा साजरा करण्यात येत आहे.अध्यक्ष सिद्राम वाघमोडे ,भीमराव धडके , सुभाष तारापुरे , डॉ.मनोहर मोरे ,कुमार पतंगे , महिला अध्यक्षा सुखदा ग्रामोपाध्ये ,अश्विनी शिंपी , कावेरी धरणे , प्रियंका आजगोंडा , मनीषा जाधव , दीपा कोकणे ,आरती काळे ,सुवर्णा इंगळे , राहूल होटकर,ह.भ.प चंद्रकांत डांगे आदिसह समर्थ नगरी परिवारातील सदस्य मित्रमंडळी परिश्रम घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!