सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित 1000 व्यक्तींचा मरणोत्तर नेत्रदान संकल्प अभियान नोंदणी व शुभारंभ कार्यक्रम नुकताच सुभद्राई मंगल कार्यालय येथे सोलापुरातील डोळ्यांचे निष्णात डॉ. नवनीत तोष्णीवाल यांच्या हस्ते शहराध्यक्ष भारत जाधव शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज भरून करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले.
प्रास्ताविक भाषणात शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी या नूतन संकल्पना अभियानाची माहिती देताना सांगितले की, मरणोत्तर नेत्रदान केल्याने आपले नातेवाईक दृष्टी रुपी अनेक वर्षे जिवंत राहू शकतात, आपण त्यांना आपला माणूस आपल्या समोर आहे अशी भावना कायम मनात राहते.
सत्काराला उत्तर देताना डॉ.नवनीत तोष्णीवाल यांनी नेत्रदानाचे महत्त्व सांगताना उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जास्तीत जास्त लोकांकडून अर्ज भरून घेण्याचे आवाहन केले.
यानंतर शहराध्यक्ष भारत जाधव यांनी आपल्या भाषणात आयोजित संकल्पने अंतर्गत आजपासून नोंदणी अभियानाची सुरुवात झाल्याचे सांगताना कार्यक्रमाच्या ठिकाणी १०० लोकांनी नोंदणी केल्याचे सांगितले व येत्या 22 जुलैपर्यंत 1000 लोकांचे फॉर्म भरून घेण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाला प्रदेश सचिव शंकर पाटील, राष्ट्रवादीचे नेते माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, माजी उपमहापौर पद्माकर नाना काळे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, गटनेते नगरसेवक किसन जाधव, शहर उपाध्यक्ष सौ मनीषा माने, प्रांतिक सदस्य जावेद खैरादी, बशीर भाई शेख, दादा चौधरी, राजन भाऊ जाधव, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान, महिला शहराध्यक्ष सुनिता रोटे कार्याध्यक्ष लता ढेरे, युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड, युवती शहराध्यक्ष आरती हुल्ले, विद्यार्थी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रमोद भांगे,शहराध्यक्ष निशांत सावळे, विद्यार्थी कार्याध्यक्ष अजिंक्य शिंदे, तिन्ही विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष आमीर शेख तनवीर गुलजार प्रकाश जाधव, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष राजू भाई कुरेशी पर्यावरण विभाग अध्यक्ष सोमनाथ शिंदे सोशल मीडियाचे मिलिंद गोरे, प्रमोद भोसले, रिक्षा संघटनेचे महिपती पवार, वक्ता प्रशिक्षण विभागाचे शहराध्यक्ष नागेश निंबाळकर, शहर सेक्रेटरी बाळासाहेब मोरे, जब्बार मुर्षद, बसवराज कोळी, लहू हावळे, श्याम गांगर्डे, श्रीशैल् हिरेमठ, प्रवीण साबळे, ज्योतिबा गुंड, शिवराज विभुते, आयुब पठाण, आशिष जेटिथोर, संजय मोरे, पद्मसिंह शिंदे तसेच महिला पदाधिकारी अश्विनी भोसले, चित्रा कदम, गौराताई कोरे, मार्था असादे, युवती पदाधिकारी पूजा वाकसे, आरती हब्बू, सुप्रिया लोंमटे, उषा बामणे असे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान यांनी केले.
सर्व 1000 नेत्रदात्यांचे भरलेलं अर्ज/फॉर्म हे श्रीमती मिश्रीबाई गुलाबचंद तोष्णीवाल आय बँक ट्रस्ट आणि रिसर्च फाउंडेशन सोलापूर ला देण्यात येणार असून पुढील काळात ही संकल्पना आणखी मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार असून योग्य तो पाठपुरावा करणार असल्याचे संतोष पवार यांनी सांगितले.