ध्यास विश्वसार्ह बातमीचा

“या” कारणामुळे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी नोंदवला आक्षेप

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गुजरात दिव-दमनच्या दौऱ्यावर गेले आहेत.त्यांच्या या दौऱ्यावरून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले की, मुख्यमंत्री उद्वव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेते सर्व संकटाशी सामना करण्यास सक्षम आहेत. मुख्यमंत्री ठाकरे सक्षम आहेत, याची खात्री पंतप्रधानांनीही पटली असावी. म्हणून ते महाराष्ट्रात आले नाही.असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी यांना लगावला आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरात आणि गोव्यामध्ये जाण्यासाठी वेळ आहे. मात्र महाराष्ट्रात येण्यासाठी वेळ नाही अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे त्याबरोबरच महाराष्ट्रातही वादळ आलं आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातही येऊन पाहणी केली पाहिजे,असे नाना पटोले यांनी म्हंटले आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सुद्दा ट्विटकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र बरोबर भेदभाव करत असल्याची टीका केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!