ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गावपातळीवरील सर्व समस्यांवर लवकरच तोडगा काढू ; आ. सुभाष देशमुख यांचे सरपंचांना आश्‍वासन

सोलापूर (प्रतिनिधी) : ग्रामविकासाच्या अनुषंगाने आगामी काळातील कामांचे नियोजन योग्यप्रकारे केले जाईल, गावपातळीवरील सर्व समस्यांवर योग्य त्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल,  सर्व विभागातील अधिकार्‍यांची आणि सरपंचाची एकत्रित बैठक घेऊन समस्यांवर तोडगा काढला जाईल, असे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख यांनी केले.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील सरपंचाची बैठक सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी घेण्यात आली, त्यावेळी उपस्थित सरपंचांशी संवाद साधताना आ. देशमुख बोलत होते.  यावेळी उपस्थित सरपंचांनी गावातील विविध समस्या मांडल्या. यात प्रामुख्याने केंद्राकडून थेट ग्रामपंचायतीला येणार्‍या 15 व्या वित्त आयोग्याच्या निधीला राज्य सरकारकडून खोडा घातला जात असल्याचा आरोप करण्यात आला.

राज्य सरकारने पथदिव्यांचे बिले ग्रामपंचायतीलाच भरण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे इतर विकासकामांना निधी कमी पडणार आहे. त्यामुळे हा निर्णय बदलावा, अशी मागणी सरंपचांनी केली. यावर आ. देशमुख यांनी याबाबत लवकरच सीईओंसोबत बैठक लावून हा प्रश्‍न मार्गी लावण्यात येईल, असे सांगितले.

यावेळी अतुल गायकवाड, कलावती खंदारे,  जगन्नाथ गायकवाड,  श्यामराव हांडे,  शिवानंद बंडे,  जयश्री सगरे,  हनुमंत कुलकर्णी,  भारत बिराजदार,  यतीन शहा, गौरीशंकर मेंडगुदले  सुखदेव गावडे,  श्रीमंत बंडगर, ईराप्पा बिराजदार यांच्यासह तालुक्यातील सरपंच उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!