ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापुरात हातभट्टी दारू वाहतूक : दोन कार, ऑटोरिक्षा व दोन दुचाकी जप्त

सोलापूर : प्रतिनिधी

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने दोन दिवसात जिल्ह्यात विविध ठिकाणी देशी-विदेशी दारु व हातभट्टी दारू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करून २ कार, ऑटोरिक्षा व दोन दुचाकी वाहने जप्त केली.

सविस्तर वृत्त असे की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीवर सातत्याने कारवाई करण्यात येत असून याच मोहिमेअंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी सकाळच्या सुमारास अशोक चौक परिसरात प्रभू पिरप्पा ठणकेदार (वय २७, रा. मड्डी वस्ती) हा त्याच्या हिरो होंडा कंपनीच्या मोटारसायकल (क्र. एमएच १३ सीएफ ६१७४) वरून दोन रबरी ट्यूबमध्ये १६० लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एका अन्य कारवाईत याच पथकाने भुलाभाई चौक येथे सापळा रचून एका ऑटो रिक्षा (क्र. एमएच १३ सीटी १३६३) मधून अमर बाबू राठोड (वय २६) व राहुल बाबू राठोड (वय ३५, दोघेही रा. बक्षीहिप्परगा, ता. दक्षिण सोलापूर) हे हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. त्यांच्या ताब्यातून चार रबरी ट्यूबमधील ३२० लिटर हातभट्टी दारूसह एकूण १ लाख ८२ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई निरीक्षक सुनील कदम, दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे, जवान नंदकुमार वेळापुरे, अण्णा कर्चे, अशोक माळी व वाहनचालक दीपक वाघमारे यांच्या पथकाने पार पाडली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!