मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागले आहे. काल राज्यात ८ हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या चिंतेत भर पडली आहे. पुन्हा लॉकडाउनचे संकेत दिले जात आहे. मुंबईत ही कोरोनाचे निर्बंध कठोर करण्यात आले आहे. लोकल सेवा बंद होणार असल्याची चर्चा होत असतांना महाविकास आघाडीचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोकल सेवा बंद नाही करणार परंतु फेऱ्या कमी करण्यात येणार असल्याचे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सरकारला उपाययोजना करावे लागणार आहे.
राज्यातील शाळा सध्या बंद करण्यात आल्या आहेत. तामिळनाडूसह इतर राज्यांमध्ये विद्यार्थ्यांना पास करण्यात आले आहे. त्याचाही विचार महाराष्ट्रात होणार आहे. महाराष्ट्र सरकारही विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा विचार करत आहे असेही मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.