ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागणार ? ५ वर्षानंतर या रोगाचे संक्रमण,

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

जगभरात सन २०१९ मध्ये कोरोनाचा मोठा थैमान सुरु झाला होता आता पुन्हा एकदा चीनमध्ये एका गूढ आजाराने थैमान घातले असून लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांमुळे रूग्णालय पुन्हा फुल्ल झाले आहेत. या ठिकाणी गर्दी दिसत असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत असल्याने जगाची चिंता वाढली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याविषयीचे व्हिडिओ आणि छायाचित्र तेजीने व्हायरल होत आहेत.

चीनमधील काही रुग्णालयात गर्दी दिसून येत आहे. चीनमधील कोरोना आजाराने संपूर्ण जगाला वेठीस धरले होते. चीनवर त्यावेळी जगभरातून टीका झाली होती. जगभरात लॉकडाऊन लागले होते. आता इन्फ्लुएंजा ए, मायकॉप्लाज्मा न्यूमोनिया आणि ह्यूमन मेटापनेयूमोवायरस (hMPV) या आजारांचे प्रमाण वाढल्याचा दावा करण्यात येत आहे. ही एक महामारी असल्याची चर्चा होत आहे. अर्थात जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि चीन सरकारकडून याविषयीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
चीनमध्ये श्वसनासंबंधीच्या आजारात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. खासकरून रुग्णालयात लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांची गर्दी वाढली आहे. रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने हा प्रकार होत असल्याचे समोर येत हे. पण हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा प्रसार झपाट्याने वाढला आहे. त्याची लक्षण ही सर्दी-पडशा सारखी आहेत. यामध्ये ताप, खोकला, नाक वाहणे, श्वास घेताना धाप लागणे वा श्वास घेण्यास कष्ट पडणे अशी लक्षणं दिसत आहेत. चीन सरकार अथवा डब्ल्यूएचओने याविषयी कोणताही अलर्ट दिला नाही. हा आजार वातावरणातील बदलामुळे झाला की चीन सरकारने पुन्हा एकदा हलगर्जीपणा केला हे समोर आलेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!