ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाराज आणि वारकऱ्यांचे लसीकरण करूनच त्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश द्यावा – नगराध्यक्षा साधना भोसले

सोलापूर : पालखी सोहळ्यासोबत येणारे महाराज आणि वारकऱ्यांचे लसीकरण करूनच त्यांना पंढरपूर मध्ये प्रवेश द्यावा, अशी मागणी पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांनी केली आहे.

यंदाही आषाढी वारी ही पायी होणार नसून मानाच्या दहा पालख्या एसटीबसद्वारे पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. हा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नुकताच दिला होता.

संतांच्या मानाच्या सातही पालखी सोहळे थांबत असलेले मठ हे प्रदक्षिणा मार्गावर असून शहराची सर्वात जास्त लोकसंख्या प्रदक्षिणा मार्गाच्या आतल्या बाजूस आहे. यामुळे येणारे वारकरी लसीकरण करून आले तर नागरिकांना धोका कमी निर्माण होईल, अशी भूमिका नगराध्यक्ष साधना भोसले यांनी मांडले आहेत.

पंढरपूरमध्ये कोरोना आणि म्युकरमायकोसिचे रुग्ण कमी झालेले नाहीत. रोज नवीन रुग्णांची मोठ्या संख्येने भर पडत आहे. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा फार मोठा फटका पंढरपूर परिसराला बसल्याने गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही प्रातिनिधिक स्वरूपातच वारी करण्याची भूमिका पंढरपूरमधील नागरिकांची आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!