---Advertisement---

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली शाहू महाराजांची भेट

Follow Us:
---Advertisement---

कोल्हपुर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शाहू महाराज यांची नवीन राजवाडा येथे जाऊन भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणावरुन आक्रमक भूमिका घेतली असताना अजित पवार यांनी घेतलेली ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे अजित पवार आणि शाहू महाराज यांच्या भेटीनंतर सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचं वक्तव्य शाहू महाराजांनी केलं आहे.

मराठा आरक्षणाच्या इतर मागण्यांकडे सरकारचं लक्ष असून यापुढेही राहणार आहे. आंदोलन बाबत आमच्यात कोणती चर्चा झालेली नाही. मराठा समाजाने आता स्वत: सक्षम होऊन आपल्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे. दरम्यान या भेटीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अद्यापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!