दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी युपीएचे नेतृत्त्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना देण्यात यावे असे वक्तव्य केले होते. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेपटोलेंसह इतर नेत्यांनी टिका केली होती व संबंध नसलेल्या विषयांवर युपीएचे घटक पक्ष नसलेल्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी बोलू नये असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते.
यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले कि, युपीए’चे अध्यक्षपदाचा विषय हा केंद्रातील चर्चेचा विषय आहे. यावर युपीएमधील घटक पक्षांनीच बोलाके असे काही नाही. दिल्लीतील विषयांमध्ये महाराष्ट्रातील नेत्यांनी पडू नये’ असे संजय राऊत आज सकाळी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले. काही पक्ष युपीए-२ बनवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे युपीएला धक्का बसु शकतो असेही संजय राऊत म्हणाले.
हा विषय केंद्रातील विषय आहे. या विषयावर राज्यातील किंवा जिल्हा-तालुका स्तरावरील नेत्यांनी यावर भाष्य करू नये. असे म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना प्रत्युत्तर दिली. देशामध्ये भाजपविरोधात विरोधी पक्षांची मजबूत आघाडी उभी करण्यासाठी यूपीए विषयी चर्चा व्हायलाच पाहिजे. ही गोष्ट महाराष्ट्रातील नेत्यांना समजत नसेल तर त्यांना अभ्यास करण्याची गरज असल्याचा टोलाही संजय राऊतांनी लगावला.