ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सद्गुरू श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर

मुंबई :  प्रतिनिधी

येथील आघाडीचे दैनिक आफ्टरनून वाईस यांच्या वतिने आध्यात्म, भक्ती आणि सांस्कृतिक संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा “महाराष्ट्र रत्न” पुरस्कार श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे पंढरपुर समितीचे सहअध्यक्ष तथा श्री नाथ संस्थान औसाचे अध्यक्ष सद्गुरू.श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर यांना जाहीर करण्यात आला आहे.

मुंबई येथे दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 05 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, नरिमन पॉईंट येथे या पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने दिलेल्या सर्व जवाबदार्‍याचे उत्कृष्ट कार्य व वारकरी सांप्रदयात दिलेल्या समर्पणाबद्दल औसेकर महाराजांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे दैनिकाचे मुख्य संस्थापक संपादक डाॅ.वैदही तमन यांनी सांगितले आहे.

औसेकर महाराज यांना यापूर्वी पूणे येथे शांतिदूत परिवाराच्या वतिने “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार तर वारकरी संप्रदायातील मानाच समजला जाणारा “वारकरी” पुरस्कार मिळाला आहे तसेच काशी पिठ, केदार पिठ, रंभापूरी पिठ, अक्कलकोट देवस्थान यांच्या वतिनेही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!