ध्यास विश्वसार्ह बातमीचा

म्हाडा पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांनी अटक केले आहे. तुकाराम सुपे यांना म्हाडा पेपर फुटी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तुकाराम सुपे यांना हे टीईटी परिक्षेत अपात्र झालेल्या उमेदवारांकडून पैसे घेऊन पास केल्याची माहिती आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या अटकेत असलेले डॉ. प्रीतिश देशमुख यांच्या घरी टीईटी परीक्षेची ओळखपत्र सापडल्यामुळे त्यांनी तुकाराम सुपे यांना काल गुरुवारी चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. सुपे यांची चौकशी केल्यानंतर त्यांना आज अटक करण्यात आली.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) परीक्षा गैरव्यवहार होत असल्याची कुणकुण लागताच रद्द करण्यात आली. परीक्षा रद्द करण्यात आल्याने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना माफीही मागावी लागली होती. म्हाडा पेपर गोपनियता भंग प्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाई करत सहा जणांना अटक करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केल्यानंतर जी. ए. टेक्नॉलॉजी कंपनीकडे महाराष्ट्रातील जवळपास २० जिल्ह्यांच्या पोलीस भरतीची जबाबदारी दिली होती. आणि या कंपनीकडून राबवलेल्या सर्वच भरती प्रक्रियांमध्ये संशय निर्माण झाला होता. यानंतर पोलिसांनी तपास केल्यानंतर जी. ए. टेक्नॉलॉजी कंपनीचे प्रमुख प्रितेश देशमुख यांचा हात असल्याचे उघड झाल्यानंतर त्यांना अटक केली.

डॉ. प्रितीश देशमुख याला अटक केल्यावर पोलिसांचा संशय अधिक बळावला. त्यांनी डॉ. देशमुख याच्या घराची झडती घेतली. या वेळी टीईटी परीक्षार्थींची ओळखपत्रं मोठ्या प्रमाणावर आढळून आली होती. याशिवाय विद्यार्थ्यांची हॉल तिकीट्सही आढळून आली होती. त्यामुळे टीईटी परीक्षेत झालेला गैरव्यवहार अधिक मोठ्या प्रमाणाचा असून, त्याची व्याप्तीही मोठी असल्याचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास केला असता तपासाचे धागे तुकाराम सुपे यांच्यापर्यंत असल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावले. त्याच वेळी त्यांना अटकही करण्यात आली.

सुपेंना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणी पोलिसांना शनिवारी रात्री विश्रांतवाडीमधून दोन दलालांना अटक केली तर औरंगाबादमध्ये आणखी दोन दलालांना अटक करण्यात आली आहे. मुंबई, पुणे आणि औरंगाबादमध्ये पोलीस चौकशी करीत आहेत. या प्रकरणात येत्या काही दिवसात अजून काही अधिकारऱ्यांच्या चौकशी करण्यात येणार असून अधिकाऱ्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!