ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस

मुंबई : कोरोना विरुद्धच्या लढ्यात आघाडीवर असणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज जे.जे. रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. 45 वर्षांवरील सर्व नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले. कोरोनाला हरविण्यासाठी लसीकरण आवश्यक असून आतापर्यंत सुमारे 1 कोटी 22 लाख लाभार्थ्यांना लस देऊन महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. 18 ते 44 वर्षापर्यंतच्या नागरिकांचेही लसीकरण सुरू करावे, या मागणीचा पुनरुच्चार आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केला.

फेब्रुवारीमध्ये श्री.टोपे यांना कोरोनाची लागण झाली होती त्याला हरवून ते पुन्हा जनतेच्या सेवेसाठी रुजूही झाले. मात्र, लगेच त्यांना लस घेता येणे शक्य नसल्याने त्यांनी आता दोन महिन्यानंतर लस घेतली. यावेळी त्यांनी लस देणाऱ्या परिचारिका, जे.जे. रुग्णालयाचे डॉक्टर यांचे आभार मानले.

मी लस घेतली आपणही घ्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!