---Advertisement---

कोरोना इफेक्ट : 24 व 25 एप्रिल रोजीचा बोरगाव (दे ) ग्रामदैवत श्री महादेव यात्रा उत्सव रद्द…. !

Follow Us:
---Advertisement---

अक्ककलकोट : बोरगाव दे. येथे प्रतिवर्षी मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरा होणारा ग्रामदैवत महादेव यात्रा उत्सव कोविड – 19 च्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही रद्द करण्याचा निर्णय पंचकमिटी व ग्रामपंचायतीच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी यात्रा पंचकमिटी चे अध्यक्ष तथा सरपंच विलासराव सुरवसे हे होते. यावेळी पंचकमिटी चे सदस्य ज्ञानेश्वर पाटील, मोहन फुलारी, राजाभाऊ पाटील, शिवानंद किवडे, दत्तात्रय जिरगे, उपसरपंच राजेभाई मुजावर, ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण भैरामडगी, प्रा. प्रकाश सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य महंमद पठाण, महेश हत्तरके, श्रीकृष्ण मगर, पोलीस हवालदार विपीन सुरवसे, पोलीस हवालदार अंगद गीते उपस्थित होते.

बैठकीतील ठरावानुसार पोलीस निरीक्षक कलाप्पा पुजारी यांना यात्रा उत्सव रद्द करत असलेबाबतचे पत्र देण्यात आले. यात्रा उत्सवातील कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक कलाप्पा पुजारी यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

Leave a Comment

Don`t copy text!