ध्यास विश्वसार्ह बातमीचा

देशात “या” राज्यात सुरू आहे वेगात लसीकरण

मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याबरोबर महाराष्ट्रात सर्वात जास्त वेगाने लसीकरण सुरू आहे. असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले आहे. केंद्राने लसीकरणाची गती वाढवण्यासाठी दिलेली चॅलेंज आम्ही स्वीकारले आहे त्यासाठी लसीचा पुरवठा देखील वाढवावा लागणार आहे, असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नजर ठेवून आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील कोरोना परिस्थितीचा २ एप्रिल रोजी आढावा घेणार आहेत. २ तारखेनंतर लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री ठाकरे निर्णय घेतील, राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यात लसीकरण वाढवण्यास सर्व राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहनही देखील राजेश टोपे यांनी केके आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. औरंगाबाद,नांदेड,नागपूर,बीड,अमरावती या शहरामध्ये मिनीकोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लॉकडाउन केले आहे.महाराष्ट्रात देखील लॉकडाऊन लागण्याची चिन्हे दिसत आहेत.कारण,२ एप्रिलनंतर दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाउनचा निर्णय घेतली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!