ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चक्रीवादळामुळे राज्यात हलक्या पावसाची शक्यता

मुंबई वृत्तसंस्था 

गेल्या काही दिवसांपासून  राज्यात कमाल आणि किमान तापमानात कमालीची घट झाल्यामुळे थंडी जाणवत होती. पण तामिळनाडू येथे आलेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्राताली वातावरणात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याशिवाय पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आलाय. ऐन हिवाळ्यात पावसाची शक्यता वर्तवल्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे.

फंगल चक्रीवादळ शनिवारी रात्री साडेसात वाजता तामिळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकले. त्यामुळे पदुचेरी आणि तामिळनाडूच्या उत्तर भागात मुसळधार पाऊस कोसळला. या चक्रीवादळामुळे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्याशिवाय महाराष्ट्रातही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा अंदाज वर्तवलाय. चक्रीवादळामुळे तापमान वाढून थंडी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय.

मागील आठवडाभरातपासून राज्यात कमाल आणि किमान तापमानात घट पाहायला मिळले होते. त्यामुळे राज्यात थंडी वाढली होती. काही ठिकाणाचे तापमान उने १० च्या खाली आले होते. पण तामिळनाडूमध्ये धडकलेल्या चक्रीवादळामुळे ऐन थंडीत पावसाची शक्यता आहे. पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज हवामान ढगाळ शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाची शक्यताही वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजनुसार, गुरुवारपर्यंत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!