ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात महायुतीची जोरदार मुसंडी

मुंबई, वृत्तसंस्था

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. राज्या पुन्हा एकदा भाजप महायुतीचे सरकार येण्याची शक्यता आहे. ११ वाजेपर्यंतच्या कलामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसतेय. महायुतीचे उमेदवार सध्या २१८ जागांवर आघाडीवर आहेत.  एकटा भाजप पक्ष १२८ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे मविआला जोरदार धक्का बसला आहे.

२० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर आलेल्या एक्झिट पोल समिश्र आले होते. काही एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, मविआ तर काही एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुती सत्ते येईल, असा दावा केला होता. महायुतीने सर्व एक्झिट पोल फोल ठरत २१८ जागांवर आघाडी घेतली आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये कुणीही सत्तेत आले तर १६० पर जाईल, असा अंदाज वर्तवला होता.

 

महायुतीची बाजी 

विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठी मुसंडी मारली आहे. महायुतीने तब्बल २१८ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजप १२८ जागांवर आघाडीवर आहे. तर एकनाथ शिंदेंची शिवसेना ५४ आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ३५ जागांवर आघाडीवर आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!