ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर

मुंबई वृत्तसंस्था 

महाराष्ट्रात अजूनही सत्ता स्थापनेचा तिढा आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने विधिमंडळ नेतेपदी निवड होणे ही औपचारिकता मानली जाते आहे. तर अजित पवार नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होणे निश्चित असताना एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारणार का? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. अशात तीनही पक्षांमधून मंत्रिपदाचे चेहरे कोण असतील, याबद्दलची माहिती समोर आली आहे.

महायुतीमधील तीनही पक्षांच्या नेत्यांशी अमित शाह यांच्याशी गत सप्ताहात चर्चा झाली. मुख्यमंत्रिपदावर कोणतीही चर्चा न करता भाजपकडेच सत्तेच्या चाव्या राहतील, हे स्पष्टपणे वरिष्ठ नेतृत्वाने स्पष्ट केले. त्यामुळे गृह, अर्थ, नगरविकास, जलसंपदा, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम अशी महत्वाची खाती मिळविण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीत चढाओढ लागली आहे.

 

शिवसेना संभाव्य यादी

एकनाथ शिंदे

उदय सामंत (कोकण)

हेमंत पाटील (हिंगोली आणि नांदेड)

शंभू राजे देसाई (पश्चिम महाराष्ट्र)

भरत गोगावले (कोकण)

संजय शिरसाट(मराठवाडा)

गुलाबराव पाटील (उत्तर महाराष्ट्र)

दिपक केसरकर (कोकण)

प्रकाश आबिटकर किंवा राजेश क्षीरसागर (कोल्हापूर)

दादा भुसे

तानाजी सावंत

मनिषा कायंदे किंवा निलम गोऱ्हे (दोन्ही पैकी एक)

 

राष्ट्रवादी संभाव्य यादी

अजित पवार

आदिती तटकरे

छगन भुजबळ

दत्ता भरणे

धनंजय मुंडे

अनिल भाईदास पाटील

नरहरी झिरवळ

संजय बनसोडे

इंद्रनिल नाईक

मकरंद पाटील

 

भाजप संभाव्य यादी

देवेंद्र फडणवीस

राधाकृष्ण पाटील

रविंद्र चव्हाण

नितेश राणे

आशिष शेलार

संजय कुटे

चंद्रकांत पाटील

सुधीर मुनगंटीवार

अतुल भातखळकर,मंगल प्रभात लोढा, ॲड राहुल नार्वेकर (यांच्या पैकी एक)

देवयानी फरांदे

राम शिंदे, गोपीचंद पडळकर (यांच्या पैकी एक)

पंकजा मुंडे

माधुरी मिसाळ

अतुल सावे

शिवेंद्रराजे भोसले

विजयकुमार देशमुख

मोनिका राजळे

जयकुमार रावल

गिरिश महाजन

अभिमन्यू पवार

संतोष दानवे

रवी राणा, विनय कोरे किंवा आरपीआय

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!