ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मी अजून थकलो नाही, स्वामी समर्थ कारखान्याचा पुढचा हंगाम सुरू करून दाखवणार : माजी आमदार सिद्रामप्पा पाटील

 

अक्कलकोट, दि.२८ : मी अजून थकलो नाही,शेतकरी केंद्रबिंदू मानून तालुक्यात कार्यरत राहिलो आहे. सहकाराच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकर्‍यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलो. माझे वय ८० वर्ष असले तरी शेवटच्या श्वासापर्यंत तालुक्यातील शेतकर्‍यांकरिता कार्यरत राहण्याची भीष्म प्रतिज्ञा माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी केली. आणि लवकरच श्री स्वामी समर्थ साखर कारखाना आपण सुरू करून दाखवू,अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. ते काल अक्कलकोट येथे संचालक मंडळाच्या बैठकीत बोलत होते. स्वामी समर्थ सहकारी कारखान्यावर असलेले प्रशासक महाविकास आघाडी सरकारने उठवले आहे. त्यांचे आभार व्यक्त करुन पुढचा गळीत हंगाम सुरु करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.या बैठकीला माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.गत सरकारच्या काळात स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक आणले होते. जिल्हा उपनिबंधक हे यावर प्रशासक होते. आता प्रशासक संपुष्टात
आले असल्याने तातडीने साखर कारखान्याच्या अक्कलकोट येथील कार्यालयात संचालक मंडळाची बैठक
संपन्न झाली.यावेळी स्वामी समर्थ सह.साखर कारखान्याचे तत्कालीन वादग्रस्त कार्यकारी संचालक व ऊस तोडणीमध्ये गैरव्यवहार केलेले प्रल्हाद लावंड यांच्यामुळे त्यावेळी चालु असलेल्या गळीत हंगामावर परिणाम होऊन संपूर्ण विस्कळीतपणा आला. त्यावेळी तेरा जणांवर गुन्हा दाखल झालेला होता. नंतर ऊसा अभावी त्या पुढील गळीत हंगाम बंद ठेवावा लागल्याचे पाटील यांनी सांगितले.प्रशासक उठविण्याकरिता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सहकार्याने उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजय मामा शिंदे यांच्या सहकार्याने प्रशासक हटविण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.या बैठकीला उपाध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, संजीवकुमार पाटील, अप्पासाहेब पाटील, महेश पाटील, हणमंतप्पा कात्राबाद, देवेंद्र बिराजदार, दिलीपराव शावरी, श्रीमंत कुंटोजी, विवेकानंद उंबरजे, शिवप्पा बसरग्गी, प्रभारी कार्यकारी संचालक जी.आर.पाटील यांच्यासह दयानंद उंबरजे, अशोकराव मुलगे, राजशखेर मुळे, अशोकराव वर्दे, राजु सोमवंशी, मोसिन मुल्ला यांच्यासह आदीजण उपस्थित होते.प्रास्ताविक अप्पासाहेब पाटील यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!