ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लाचखोर पोलीस हवालदारास रंगेहात पकडले

माळशिरस, वृत्तसंस्था 

भावकीतील भांडणातील गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी व तक्रारदाराच्या पत्नीस अटक न करण्यासाठी आठ हजारांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार दत्तात्रय बळीराम थोरात याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. दोन भावामध्ये भांडणे झाली होती. यामध्ये दोघांनी एकमेकांविरोधात माळशिरस पोलिसात तक्रार दाखल केली होती. तक्रारदार व त्यांचा भाऊ यांना गुन्ह्यात अटकेनंतर न्यायालयातून जामीन मिळाला होता. तक्रारदारांच्या पत्नीस अटक न करण्यासाठी व दोषारोप पत्रात मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून तपास हवालदार थोरात यांनी दहा हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ८ हजार तडजोड झाली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. सापळा रचून हवालदार दत्तात्रय थोरात पकडण्यात आले.

पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार, गणेश पिंगुवाले, पोलीस अंमलदार सायबन्ना कोळी, संतोष नरोटे, गजानन किणगी, चालक राहुल गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचून थोरात यांना ८ हजारांची लाच स्विकारताना रंगेहात पकडले.

दरम्यान गेल्या काही दिवसाखाली सांगलीमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. महिला पोलीस लाच घेताना हाती आली आहे. सांगलीमध्ये पोलिसांना रंगेहात पकडले आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच घेताना विश्रामबाग पोलिस ठाण्यातील महिला हवालदार यांना पकडले आहे. अटक करण्यात आलेल्या महिला पोलीस हवालदाराचे नाव मनिषा नितीन कोंगनोळीकर उर्फ भडेकर (वय ४२, रा. शारदानगर, सांगली) असे आहे. त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहात पकडले.

एका फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी व चौकशीत मदत करण्यासाठी मनिषा कोंगनोळीकर यांनी एका व्यक्तीकडे पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारण्यासाठी मंगळवारी सांगलीवाडी येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाजवळ त्यांनी तक्रारदारास बोलावले. याबाबत संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली. त्यानुसार विभागाच्या पथकाने सांगलीवाडीत सापळा रचला होता. तक्रारदाराकडून कोंगनोळीकर यांनी पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर पथकाने त्यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी कोंगनोळीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!