मुंबई : वृत्तसंस्था
देशात आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून घटस्थापनेपासून नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा देशभरात जल्लोष अन् उत्साह पाहायला मिळत आहे.महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात आज पासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे.पहाटेच नऊ दिवसांची मंचकी निद्रा संपून देवी सिंहासनावर विराजमान झाली आहे.
भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून देखील जयत तयारी करण्यात आली आहे. नवरात्र उत्सवामुळे तुळजापूर नगरी भाविकांनी फुलून गेल्याचे चित्र आहे. राज्यासह देशभरातील लाखो भाविक तुळजापुरात दाखल होत आहेत .
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात आज पासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. देवीच्या गाभाऱ्यात दुपारी बारा वाजता तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात येणार आहे. पहाटेच मंचकी निद्रा संपून देवी सिंहासनावर विराजमान झाली असून पुढील नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देवीच्या विविध अलंकार पूजेसह रोज रात्री छबिना निघणार आहे. राज्यासह देशभरातील लाखो भाविक तुळजापुरात दाखल होत आहेत. त्यामुळे तुळजापूर नगरी भाविकांनी फुलून गेल्याचे चित्र आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून देखील जय्यत तयारी करण्यात आली आहे.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आहे. नवरात्र उत्सवाची पहिली माळ आहे. पहाटेपासूनच अंबाबाई मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केलेली आहे. नांदेड जिल्ह्यातील श्री रेणुका मातेच्या माहूर गडावर देखील नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. नऊ दिवस माहूर गडावर श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात.मंदिर संस्थानकडून नऊ दिवस गडावर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.