जालना, वृत्तसंस्था
उद्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून राजकीय घडामोडींना वेग आलाय. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांनी मोठे भाष्य केले आहे. सत्ता आली आणि लयं मोठे आले म्हणून मस्तीत यायचं नाही मराठ्यांशी बेमानी करायची नाही, नादाला लागायचं नाही असं म्हणत सरकार स्थापन करण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय, ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.
मनोज जरांगे म्हणाले, सरकार स्थापन झाल्यानंतर मराठा आरक्षणासाठी अंतरवालीत सामूहिक उपोषण करणार आहे.. त्याची तारीखही जाहीर लवकरच जाहीर करू. मराठ्यांच्या मताशिवाय सत्तेत कुणी येऊ शकत नाही. त्यामुळं सत्तेत कुणीही बसू मी त्याला सोडणार नाही. ओबीसींना मी कधी शत्रू माणलेलं नाही पण नेते सोडणार नाही. आम्हाला विरोध करणारे दोन तीनच नेते आहेत. सत्तेतल्याच माणसाला भांडावं लागत असतं . ते सत्तेत नसते तर मग विरोध करण्याचं कारणचं नाही. सत्तेत असतात तेच आरक्षण देणारे असतात म्हणून मी भांडलो. मराठा आरक्षणासाठी मी भांडणार आणि सोडणार सुद्धा नाही . शेवटी सरकार त्यांचं आहे. पालकत्व त्यांच्याकडे आहे. त्यांना गोरगरीब शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे लागणारच आहे.वैचारिक मतभेद वेगळे आणि राजकारणातले मतभेद वेगळे आहेत. शेवटी मराठ्यांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे मी सोडणार कोणालाच नाही.
सत्तेत कोणी पण बसू द्या सरकार स्थापन झाल्यावर सामुहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करू. आझाद मैदानावर उपोषण समाजाला विचारून करणार आहे. अनेक मराठ्यांचे म्हणणे आहे की पुढील उपोषण मुंबईत करावे. कारण गेल्यावेळी अलीकडूनच माघारी आलो होतो त्यामुळे पुढे जाण्याचा विचार करू. आंतरवालीत देशातील सर्वात मोठं उषोषण होणार आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.