मुंबई : वृत्तसंस्था
मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा मोर्चा मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली आता मुंबईत दाखल होत आहे. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही, आतापर्यंत समाजाची फसवणूक झाली पण इथून पुढे तसे होऊ देणार नाही अशा निर्धाराच्या त्यांनी व्यक्त केला आहे. शब्दांसह मजल दरमजल करत लाखोंच्या संख्येने एकवटलेले हे मराठा आंदोलक मुंबई गाठत इथे आरक्षणाची मागणी उचलून धरणार आहेत.
मुंबई दाखल होण्यापूर्वी आझाद मैदानावरुन पोलीस प्रशासन आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात वाद पेटला आहे. त्याचवेळी मनोज जरांगे पाटील यांनी खळबळजनक आरोप केला आहे. मी लोणावळ्यात असताना पोलिसांनी काहीतरी कागदावर सह्या घेतल्या. कोर्टाचा आदेश असल्याचे सांगितले. मी झोपेत होतो. आपण कोर्टाचा सन्मान करतो. यामुळे मी त्या इंग्रजी कागदावर लगेच सही केली. परंतु तो कागद आझाद मैदानासंदर्भात होता. आझाद मैदानाची परवानगी नाकारल्याचा तो कागद होता. माझी फसवणूक करुन ही सही घेतली आहे. परंतु जर त्याचा दुरुपयोग केला तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
वाशी एपीएमसी सेक्टर 19 चौकी बंद केल्यामुळे बस मार्ग क्रमांक 507,517,533 चे प्रवर्तन वाशी बस स्थानक येथे पहिल्या बस पासून खंडित करण्यात आले आहे.त्याचप्रमाणे वाशी बस स्थानकांकडून नेरूळकडे जाणारा आनंद ऋषी मार्ग हा शिवाजी चौकापासून बंद केल्यामुळे बस मार्ग क्रमांक 504,502,505 इत्यादीचे अप दिशेचे प्रवर्तन सायन पनवेल मार्ग, शिवाजी चौक येथे यु वळसा घेऊन पुन्हा सायन पनवेल मार्गाने सकाळी 6.00 वाजल्यापासून परावर्तित करण्यात आले आहे. बस मार्ग क्रमांक 533,517 व 507 वाशी बस स्थानक येथे पहिल्या बस गाडी पासून खंडित केले आहेत.