मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबई धडकणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीचं फलित काय झालं हे २० तारखेला कळेल. तोपर्यंत आपली मुंबईला जाण्याची तयारी झाली असल्याचं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर टीका केलीय.
सरकारने काढलेला कुणबी नोंदीचा जीआर छगन भुजबळ यांनी रद्द करा, अशी मागणी केलीय. यावरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारमधील मंत्री आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. ओबीसी नोंदी रद्द करण्याची मागणी केल्याने त्याने त्याला काहीच कळत नाही त्याचं काढूच नका, तो पूर्ण पागल झालेला माणूस आहे. मला सांगा ज्यात शासकीय नोंदी सापडल्या त्यात देव जरी आडवायला तरी त्या नोंदी रद्द होतील का? ओबीसी आरक्षण रद्द होऊ शकतो का?
जर तो कायद्याच्या पदावर राहतो मंत्रिमंडळात काम करतो आणि तुला तेवढे सुद्धा नॉलेज नाही. ज्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या त्या रद्द होत नसतात. जर त्या रद्द झाल्या तर तुमचं आरक्षण १५ मिनिटात रद्द होऊ शकतो. ओबीसींना वाटतय मराठ्यांच्या काही नोंदी सापडले असतील तर त्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे. मात्र छगन भुजबळ दोन समाजात दरी निर्माण करत आहेत त्यामुळे ओबीसी बांधवांना विनंती आहे तो राजकारणी माणूस आहे त्यामुळे तुमच्यात आणि आमच्या दरी नको, असं आवाहनही जरांगे-पाटील यांनी केलं.