ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मनोज जरांगे पाटलांचे आज ठरणार उमेदवार !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात विधानसभा निवडणूक होत असून यंदाच्या निवडणुकीत अनेक पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले असून तसंच काही संघटनादेखील यंदा आपले उमेदवार रिंगणात उतरवत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवत आहेत. अशातच आज जालन्यातील अंतरवली सराटीत महत्त्वाची बैठक होणार आहे. ज्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यांना मनोज जरांगेंनी अंतरवलीत बोलावलं आहे. या उमेदवारांशी संवाद साधणार आहेत. कोण उमेदवार असेल? याबाबत मनोज जरांगे पाटील आज निर्णय घेणार आहेत. आज संध्याकाळी पाच वाजता उमेदवार आणि मतदारसंघ याची घोषणा मनोज जरांगे पाटील करणार आहेत.

ज्या मतदारसंघात ज्याला वाटतं की आपण निवडणूक लढवली पाहिजे, अशा लोकांनी अर्ज भरा. ऐनवेळी आपण ठरवू की उमेदवार कोण असेल ते…. ज्याला मी सांगेन त्याने अर्ज मागे घ्यायचा. पण जर मी सांगूनही एखाद्याने अर्ज मागे घेतला नाही तर तो आपला नाही. त्याला मदत करणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी याआधीच सांगितलं होतं. त्यानुसार मराठा बांधवांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. आता त्यापैकी कोण अधिकृत उमेदवार असेल आणि कुणी अर्ज मागे घ्यायचा. हे मनोज जरांगे आज ठरवणार आहेत. कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार असणार, याबाबत मनोज जरांगे पाटील आज निर्णय घेणार आहेत. आज संध्याकाळी पाच वाजता उमेदवार आणि मतदारसंघ याबाबत ते घोषणा घोषणा करणार आहेत.

मनोज जरांगे पाटलांनी सर्व उमेदवारांना आज अंतरवाली सराटीत बोलावलं आहे. मराठा मुस्लिम मागासवर्गीय यांचं समीकरण तयार करून निवडणुकीत उमेदवार उभे केले गेले आहेत. आज मनोज जरांगे उमेदवारी घोषित करणार आहेत. कुठं उमेदवार देणार कुठे माघार घेणार हे आज ठरणार आहे. ज्या ठिकाणी आपण निवडून येऊ शकतो, अशा जागांवर आपण उमेदवार देऊ. ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी आहे, अशा ठिकाणी जो उमेदवार मराठा आरक्षणाच्या बाजूने असेल त्या उमेदवारांना पाठिंबा द्यायचा. जिथं हे दोन्ही शक्य नाही. अशा ठिकाणी उमेदवारांना पाडण्याची भूमिका मनोज जरांगेंनी जाहीर केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!