ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मनोज जरांगे पाटलांचा आंदोलानाचा मार्ग मोकळा !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या काही महिन्यापासून झुंज देत असतांना आता मुंबईतील आंदोलनाविरोधात दाखल झालेली एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शु्क्रवारी फेटाळून लावली. आम्ही येथे कायदा – सुव्यवस्था राखण्यासाठी बसलो नाही, असे खडेबोल यावेळई न्यायालयाने यावेळी ही याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्याला सुनावले.

हेमंत पाटील नामक व्यक्तीने मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मराठा व ओबीसी या दोन्ही समुदायांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी मागितली आहे. याच दिवसापासून या समाजांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेची भीती निर्माण होण्याची भीती असल्याने जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी पाटील यांनी आपल्या याचिकेद्वारे केली होती. पण उच्च न्यायालयाने त्यांची याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला.

मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा ठरलेल्या मनोज जरांगे पाटलांनी आपल्या मुंबईला जाण्याच्या मार्गाची घोषणा केली आहे. मराठा समाजाची पायी दिंडी 20 जानेवारी रोजी सकाळी 9 वा. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघेल. त्यानंतर ती मजल दरमजल करत अहमदनगर – पुणेमार्गे मुंबईला पोहोचेल, असे ते म्हणालेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!