ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मनोज जरांगे पाटलांचा गौप्यस्फोट : हत्येच्या कट रचला ‘या’ नेत्याने !

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही वर्षापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे हत्यार उपसणारे मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कट रचल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणाची गंभीर दखल जालना पोलिसांनी घेतली असून पोलिस तपासात दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात एका बड्या नेत्याचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता.

आज या प्रकरणी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत धक्कादायक माहिती देत मोठा दावा केला आहे. यामुळे राजकीय विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. जरांगे यांच्या हत्येचा कटासाठी अडीच कोटी रुपयांची कॉन्ट्रॅक्ट किलिंगची ऑफर देण्यात आल्याचे समोर आले होते. या प्रकरणात मनोज जरांगे यांनी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी हा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे.

बीडच्या मोठ्या नेत्याच्या पीए की कार्यकर्ते यांनी मिळून हत्येचा कट रचला. त्यामागे धनंजय मुंडे होते, असा अत्यंत गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. त्यांनी भेट घेत कसा मारायचं याचा प्लॅन केला. गाडीने गाडी धडकून मारू, असा प्लॅन झाला. त्यासाठी परराज्यातील पासिंग असलेली गाडी देण्याची तयारी धनंजय मुंडे यांनी दाखवली, असेही जरांगे यांनी सांगितले. बीडचा एका मोठ्या नेत्याची पीए की कार्यकर्ता तो आरोपींकडे गेला. येथून घटनाक्रम सुरू झाला, अशी धक्कादायक माहिती मनोज जरांगे यांनी दिली. कांचन नावाचा माणून धनंजय मुंडेचा पीए आहे. तो आरोपांनी धनंजय मुंडे यांच्याकडे घेऊन गेला, असेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!