मराठवाडी येथे प्रवेश बंदीच्या निर्णयासह साखळी उपोषण सुरू,संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांना वाढता पाठिंबा
अक्कलकोट ,दि.२९ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढत असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी अक्कलकोट तालुक्यातील मराठवाडी येथे रविवारी, २९ ऑक्टोबर रोजी हनुमान मंदिरसमोर उपोषणास
प्रारंभ करण्यात आला.मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्ष व नेत्यास गावात प्रवेश नाही, असा प्रवेश बंदीचा फलक मराठवाडी या गावात मराठा क्रांती मोर्चाच्या समर्थकांनी गावाच्या वेशीजवळ लावला आहे. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना मराठवाडी या गावात प्रवेश बंदीचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.
संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ सकाळपासून हनुमान मंदिरासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. यावेळी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. सकल मराठा आयोजक रणजीत गुळवे, दशरथ गायकवाड, लहू गुळवे, तुळजाराम गाजरे, धनंजय निंबाळकर, विष्णू जाधव, मधुकर पवार, भगवंत जाधव, जगन्नाथ गुळवे, राजेंद्र जाधव, बंडू पवार, राहुल पाटोळे, मनोहर कुसेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.