सोलापूर वृत्तसंस्था
सोलापूर जिल्ह्यातल्या मारकडवाडी गाव प्रचंड चर्चेत आले आहेत. मारकडवाडी ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी मोठे आंदोलन उभारले होते. या गावात अनेक नेते येऊन गेले. याबाबत आता सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत मत व्यक्त केले आहे.
मारकडवाडी ग्रामस्थांना जर काही संशय असेल तर त्यांनी न्यायालयात जावे. पण त्यांना चाचणी मतदान घेण्याचा अधिकार नाही. प्रशासनावरील येथील जनतेचा विश्वास कमी झाला आहे, असे मला अजिबात वाटत नाही. जनतेचा प्रशासनावरील विश्वास कमी झाला असता तर इथं बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण झाली असती, असेही ते यावेळी म्हणाले.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, बांग्लादेशमध्ये जे घडलं लोकांना निवडणूक प्रक्रियेवर विश्वास नाही. त्यानंतर विद्रोह झाला होता, अशी परिस्थिती कुठेही नाही. प्रशासकीय यंत्रणांवर त्यांना विश्वास आहे पण ईव्हीएमवर जर काही लोक अविश्वास दाखवत असेल तर त्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यापूर्वी त्याविषयी संपूर्ण माहिती घ्या. मारकडवाडी गावातील असाल किंवा evm मशीन बद्दल जे बोलत आहेत.त्यांनी अजून त्या संदर्भात अर्ज केलं नाही. चाचणी मतदानाबद्दल सुरक्षा काय आहे ते पण सांगा.निवडणूक घेण्याचा अधिकार आपला नाही.ते इलेक्शन कमिशनला आहे.
तसेच माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी ग्रामस्थांना फेरमतदान घेण्याची मागणी केली. निवडणूक आयोगाला मतदान घेण्याचा अधिकार आहे. मारकडवाडी ग्रामस्थनी जे मागणी केली होती ती प्रांत अधिकारी आणि तहसील यांनी फेटाळाली. 2 ते 5 डिसेंबर आचारसंहिता गावात लागण्यात आहे. 5 डिसेंबर रोजी आंदोलनामुळे गावातील ग्रामस्थांवर गुन्हे दाखल झाले. चाचणी बद्दल हा विषय अनेकाने प्रश्न उपस्थित केले. मारकडवाडी ग्रामस्थांना असा जर काही संशय असेल तर त्यांनी न्यायालयात जावे. पण त्यांना चाचणी मतदान घेण्याचा अधिकार नाही.. EVM बद्दल अनेक वेळा माहिती दिली आहे.
EVM चालू करताना एफएलसीएल आम्ही काम करून घेतले होते. सोलापूर शहरातील रामवाडी गोदामातून आम्ही EVM मशीन काढली त्यावेळेस राजकीय प्रतिनिधी उपस्थित होते. EVM मशीनमध्ये जीपीएस सिस्टीम आहे. अकलूज येथील वखार मंडळाच गोडवान मध्ये 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी आम्ही प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी समोर उपस्थित आम्ही केले. त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे उत्तम जानकर यांचे प्रतिनिधी त्यावेळेस उपस्थित होते.उपस्थित असणाऱ्या प्रतिनिधीचे नाव जिल्हाधिकारी वाचून दाखवत अनेक मुद्दे खोडून काढले . EVM मशीन उघडल्यानंतर आम्ही प्रतिनिधींना पाच मतदान करण्यासंदर्भात सूचना देत असतो. माळशिरस तालुक्यातील 96 क्रमांकाच्या मशीनवर चार पोलिंग एजंट होते. ज्यांनी उमेदवाराची अपेक्षा घेतला आहे त्याच्याही एजंट उपस्थित होते.. उमेदवाराचे प्रतिनिधीकडून मोकपॉल घेतो त्यांना सांगत असतो. अकलूज येथील स्ट्राँग रूम बंद झाल्यानंतर त्यावेळेसही प्रतिनिधी उपस्थित असल्याचे कुमार आशीर्वाद म्हणाले.
मारकडवाडी गावाची EVM उघडल्यानंतर जानकर यांच्या प्रतिनिधींची नावे वाचून दाखवली. त्यावेळेस त्या उमेदवारांनी कोणताही अपेक्ष घेतला नाही. मारकडवाडी EVM उघडताना आम्ही त्याच्या प्रतिनिधी मोकपॉल घेतल्यानंतरच आम्ही मतमोजणीला सुरुवात केली. मेलफंक्शन आम्ही त्यात ठेवत असतो. त्यातून आम्हाला चूक दिसून येते. टेम्परिंग हे म्हणजे उमेदवारालाचे मतदान करतात त्या संदर्भात आहे त्याबद्दल आजपर्यंत एकही केस मिळाली नाही. राज्यासह देशामध्ये असे कुठे आढळून आले नाही. EVM हे पूर्णपणे स्वतंत्र आहे. EVM मशीन इंटरनेट नाही. त्यामुळे ते हॅक होण्याचा कारण नाही. सीसीटीव्ही कक्षात ईव्हीएम मशीन असते.. तीन प्रकारची सुरक्षा व्यवस्था आहे. EVM मशीनबद्दल 56 d कलम आहे. त्यातून तुम्ही व्हीव्हीपॅट तपासू शकतो, असे जिल्हाधिकारी म्हणाले.