दुधनी दि. ३१ : दिवाळी सण हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा सण म्हणून साजरा केला जातो. दिपावली सणाला वसुबारसाने सुरुवात केली जाते. त्या पाठोपाठ लक्ष्मी पूजन, नंतर नरक चतुर्दशी, त्यांनतर पाडवापूजन. दिवाळी येणार आहे म्हंटले की घरातील लहानापासून अबाल वृद्धांच्या मनात खरेदीचा उत्साह असतो. या पार्श्वाभुमीवर दुधनी शहरातील सर्व व्यापार्यांअनी दुकानासमोर मंडप व विद्युत रोषणाई करून ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी दुकाने सजवली आहेत.
मात्र यंदा दिवाळी सण तोंडावर आला तरी म्हणावी तशी बाजारपेठेत ग्राहकांचा उठाव होताना दिसून येत नाही. कारण कोरोना महामारीने सर्व सामान्य माणसांचे जीवन जगणे मुश्किल करुन टाकले आहे. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून सर्वच कामकाज बंद असल्याने सामान्य माणूस हा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच अजूनही कोरोनाचे सावट दिपावली सणावर असल्याने याचाच परिणाम दीपावली बाजार पेठेवर होताना दिसून येत आहे.
दिवाळी हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जात असल्यामुळे आकाशकंदील, पणत्या खरेदी करण्यात कुटुंबातील सदस्य मग्न आहेत. दिवाळी ही गोडधोड पदार्थांची असल्यामुळे किराणा साहित्य खरेदीसाठी किराणा दुकांनांमध्ये हवी तशी गर्दी दिसत नाही. दिवाळी सणाला आठ दिवसा अगोदर कपडे खरेदी, फराळसाठी लागणार किराणा खरेदी केली जाते. त्या नंतर घर सजावट करण्यासाठी लागणारे वस्तू खरेदी केली जाते. यंदाच्या वर्षी कोविड- १९मुळे शासनाने सर्व सणांवर बंदी आणली होती.
सद्या कोरोना महामारीचा प्रमाण काही प्रमाणात कमी झाली असल्यामुळे काही प्रमाणात सवलत दिली असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गांधी चौक, भाजीपाला मार्केट परिसर येथे स्टेशनरी दुकानदारांनी कागदी, व प्लास्टीकचे देशीबनावटीचे आकाश कंदील व पणत्या मोठया प्रमाणात विक्रीसाठी ठेवल्या आहेत. घरोघरी आकाशकंदील व पणत्या लावण्याची संस्कृती असल्यामुळे मोठया प्रमाणात या व्यवसायातून आर्थिक उलाढाल होत असते.
खास दिपावळीसाठी बाजारात भारतीय बनावटीच्या पणत्या, आकाशकंदील, दिव्यांचे माळा, विविध परकारच्या रांगोळ्या, दिनदर्शीके, विविध प्रकारचे प्लास्टीक व कापडी फुलांचे माळ, बाजरात उपलब्ध झाल्या आहेत. देशी बनावटीचे आकाशकंदील ५० रूपयेपासून ते ५०० रूपयेपर्यंत तर पणत्या ६० रूपये डझनपासून ते १०० रूपये पर्यंत विक्रीस उपलब्ध आहेत. कापड व्यावसायिकांनीही नवनवीन कंपन्याचे रेडीमेड कपडे व साडया दुकानातून विक्रीस आणल्या आहेत. दिवाळी पार्श्व भुमीवर कपडयांची खरेदी मोठया प्रमाणात प्रतिवर्षी होत असते. यंदाच्या वर्षीही कपड्यांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी कमी प्रमाणात दिसुन येत आहे.