दुधनी : दुधनी येथील एस. जी. परमशेट्टी हायस्कूल येथे थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्त शाळेत गणित दिन उत्साहात साजरी करण्यात आले. या निमित्त दि.२० डिसेंबर रोजी शाळेच्या सभागृहात शालेय गणित प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यामध्ये ईयत्ता ५ वी १० वी या वर्गातील एकूण १३० विद्याथ्यानी सहभाग नोंदवून एकापेक्षा एक उत्कृष्ट गणित उपकरण सादर केले. सदर गणित प्रदर्शन पाहण्यासाठी गावातील इतर प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालक वर्ग भेट दिली.
याप्रसंगी तालुक्याचे विस्तार अधिकारी भिमाशंकर वाले यांनी हायस्कूलला भेट देऊन शाळेचे, मार्गदर्शक शिक्षक व सहभाग विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक केले. त्यानंतर गुरुवार दिनांक २२ डिसेंबर रोजी सकाळी प्रशालेच्या प्रांगणात गणित दिन कार्यक्रम घेण्यात आले. सदर कार्यक्रमामध्ये प्रदर्शनातील मानकरी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिस देवून गौरविण्यात आले. गणित दिनानिमित्त भाषण, गणित गीत, नाटक, कोडे, जोक्स आणि गणित प्रतिज्ञा असे अनेक उपक्रम राबविले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती कल्याणराव वागदरगी, सुभाष परमशेट्टी,सौ अंबिका टक्कळकी, संतोष जोगदे, बसवराज खंडाळ यांच्यासह अन्य पालक वर्ग उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक रेवणसिद्ध आलिगावे, पर्यवेक्षक लक्ष्मीपुत्र गद्दी, गणित प्रमुख सिद्धाराम नुला, चंद्रशेखर खंडाळ, अविनाश भैरुणगी व अन्य शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.ष.ब्र.प. जयगुरुशांतलिंगाराध्य महास्वामीजींनी सर्वांचे अभिनंदन केले.