चालू गाळप हंगामात कारखाना ६ लाख मे. टन ऊसाचे गाळप : म्हेत्रे; मातोश्री लक्ष्मी शुगरचा बॉयलर अग्नी प्रदीपन उत्साहात
अक्कलकोट ,दि.१७ : मातोश्री
कारखान्याच्या विकासात व वाटचालीत तालुक्यातील शेतकरी, ऊस उत्पादक व कर्मचारी यांचा मोठा वाटा आहे यावर्षी देखील तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला
ऊस कारखान्यास गाळपास देऊन सहकार्य करण्याचे आवाहन माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले.श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पदस्पर्शाने व वास्तव्याने पावन झालेल्या अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री लक्ष्मी शुगर को जनरेशन इंडस्ट्रिज लिमिटेड कारखान्याचा ११ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे व मॅनेजिंग डायरेक्टर शिवराज म्हेत्रे यांच्या हस्ते करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष
शितल म्हेत्रे, बोरोटी सरपंच अशोक ढंगापुरे, सिध्दप्पा पुजारी (मिरजगी), इरण्णा करवीर – (रूद्देवाडी) व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. अध्यक्षीय भाषणात कारखान्याचे चेअरमन सिध्दाराम म्हेत्रे यांनी चालू गाळप हंगामात कारखाना ६ लाख मे.टन ऊसाचे गाळप करणार असल्याचे सांगितले. त्यादृष्टिने आवश्यक असणारी ट्रक्स, ट्रॅक्टर्स, मिनी कार्ट, बैलगाडया व केन हार्वेस्टर अशी मोठया प्रमाणात यंत्रणा भरती केल्याचे सांगितले. नेहमीच तालुका व तालुक्यातील जनतेच्या विकासाचे ध्येय दृष्टिक्षेपात असल्याने व तालुक्यातील बेरोजगाराना रोजगारांच्या
संधी उपलब्ध व्हाव्यात.याकरीता यंदा ऊसतोडणीसाठी आवश्यक असणारी यंत्रणा ही जास्तीत जास्त स्थानिक व अक्कलकोट तालुक्यातील घेतली असल्याने तालुक्यातील असंख्य बेरोजगाराना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याचे सांगितले. या यंत्रणेमार्फत कारखाना गाळपासाठी आवश्यक
असणा-या ऊसाचा पुरवठा केला जाणार आहे.कार्यक्रमास कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बाळासाहेब कुटे, जनरल मॅनेजर रावसाहेब गदादे, वर्क्स मॅनेजर
कृष्णा एकतपुरे, केन हेड गुरुनाथ लोहार,केन
मॅनेजर सिद्राम गुरव, चिफ केमिस्ट माशेट्टी शिवपुत्र, ऊसविकास अधिकारी बाबुराव पाटील, चिफ अर्कोटट अंबादास बल्ला, एचआर मॅनेजर मिलिंद शिरसे, परचेस ऑफीसर सचिन कुलकर्णी, आय. टी. मॅनेजर सोमशंकर कलमणी, स्टोअर किपर श्रीकांत लोहार,सुरक्षा अधिकारी शिवानंद निंबाळ, विश्वानाथ हडलगी, सर्व अधिकारी, खातेप्रमुख, कर्मचारी व अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी बाधंवाची मोठी उपस्थिती होती.