अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
मानवी जीवन तणावमुक्त, आनंदी,भयमुक्त होण्यासाठी शारीरिक,मानसिक, आर्थिक ,सामाजिक व अध्यात्मिक स्तरावरती विकास साधून उच्चतम विकसित समाज निर्माण करणे हे तेजज्ञान फाउंडेशनचे ध्येय आहे.या ज्ञान ध्यान केंद्रामध्ये आता सर्वांना ध्यान करणे सहज शक्य होणार आहे.ही सुविधा केंद्रावर सर्वांसाठी मोफत असून या ध्यान शिबिरांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.किसन झिपरे यांनी केले.
तेजज्ञान फाउंडेशनच्यावतीने ज्ञान ध्यान केंद्राचे उद्घाटन बिराजदार निवास, प्रमिला पार्क, ए वन चौक,अक्कलकोट येथे करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. झिपरे यांच्यासह डॉ.शिवराया आडवीतोट,ऍड. अनिल मंगरूळे,पत्रकार मारुती बावडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्ञान ध्यान
केंद्राच्या फलकाचे अनावरण करून उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमांमध्ये जवळपास ६० ते ७० लोकांनी ध्यान करून शुभारंभ केला.अक्कलकोटमध्ये २०११ पासून
तेजज्ञान फाउंडेशन (हॅपी थॉट्स) वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे.
त्यानंतर ध्यान म्हणजे काय? ध्यान कसे करावे? ध्यानाचे महत्त्व, ध्यान करण्याच्या पद्धती,त्याचबरोबर सुंदर पद्धतीने ध्यान करण्याची संधी अक्कलकोट वासियांना या केंद्राच्या माध्यमातून काशी मिळणार आहे, हे रुद्राक्ष वैरागकर यांनी सांगितले. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी, सकाळी १० ते१२ या वेळेत केंद्रावरती ध्यान घेण्यात येणार आहे. सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन प्रा.महेश जवळगी यांनी केले.उपस्थितांचे स्वागत महेश मोरे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी
या केंद्राचे संयोजक ज्योती बिराजदार, कल्पना लोकापुरे, प्रा.गणेश सुतार आदिंसह संपूर्ण तेजज्ञान फाउंडेशनच्या सदस्यांनी सहकार्य केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैरागकर यांनी केले तर आभार नकुल बिराजदार यांनी मानले.