ध्यास विश्वसार्ह बातमीचा

व्यापार वृद्धीसाठी सोलापूर शहरात उड्डाण पुलाची मागणी – खा.डॉ.जयसिद्धेश्र्वर महास्वामी

सोलापूर – शहराचा वाढता विस्तार व वाहनांची रहदारी पाहता सध्या शहरात मोठ्या प्रमाणात
अवजड वाहनांची रहदारी होत आहे. शहरांतर्गत अवजड वाहनांची रहदारी टाळून वाहतूक सुरक्षित करण्यासाठी शहरात दोन उड्डाण पुलाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी दोन उड्डाण पूल लवकरात लवकर करण्याची मागणी खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी लोकसभेत केली.

लोकसभा अधिवेशनामध्ये उपस्थित केलेल्या प्रश्नामध्ये या विषयावर बोलताना खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी म्हणाले की, सोलापूर स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत आहे. तसेच सोलापूरची वाहतूकही स्मार्ट होणे आवश्यक आहे. सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यात प्रसिद्ध आहे. इथे राज्यासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातील सुमारे पाच हजार हून अधिक ट्रक तथा अवजड वाहनांची रहदारी होत असते.

विशेषतः शहरातून हैदराबाद, पुणे व विजापूरच्या तीनही दिशेला ये जा करणाऱ्या वाहनांची वर्दळ होत असते. दुपारी आणि संध्याकाळी विशेष वेळेत या गाड्या ये जा करतात. सुमारे आठ ते नऊ तास या अवजड गाड्या राष्ट्रीय महामार्गावर तशाच उभ्या असतात. यामुळे सोलापुरातील व्यापारात मंडळी आली आहे. व्यापाऱ्यांना याचा खूप मोठा तोटा सहन करावा लागत आहे. तसेच सोलापुरातील व्यापार व बाजारपेठ इतर ठिकाणी जात असल्याने शहरात दोन उड्डाण पुलाची अत्यंत आवश्यकता आहे. शिवाय वाहतूक सुरक्षित वातावरणात होण्यासाठी हे उड्डाण पुल होणे आवश्यक आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ते विजापूर रोड आणि जुना पुणे नाका ते पत्रकार भवन अशा दोन उड्डाण पुलाची मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना केली. यामुळे सोलापूरच्या विकासात मोठी मदत होणार असल्याचेही खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी लोकसभेत केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!