---Advertisement---

जय हिंदचे गणेश माने देशमुख यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश ! आमदार प्रणिती शिंदे यांचा पुढाकार

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.१७ : जयहिंद शुगर्सचे चेअरमन गणेश माने देशमुख यांनी आज मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.यावेळी खासदार हुसेन दलवाई,आमदार प्रणिती शिंदे,धवलसिंह मोहिते पाटील,जिल्हाध्यक्ष प्रकाश वाले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे नेते
उपस्थित होते.यासाठी आमदार प्रणिती
शिंदे यांनी पुढाकार घेतला होता.गणेश माने देशमुख यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाने सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष उभारणीसाठी प्रचंड मोठा फायदा होणार आहे.सहकार क्षेत्रात जयहिंद परिवाराच्या यशस्वी वाटचालीत गणेश माने देशमुख यांचे योगदान मोलाचे आहे.त्यांच्यामूळे सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा फायदा होईल,असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!