ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दिल्ल्लीच्या धर्तीवर ‘सोलापूर हाट’ ची निर्मिती व्हावी – खा.डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी

सोलापूर दि.१८ मार्च : स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असलेल्या सोलापूर शहर आणि जिल्ह्याचे अनेक अंगाने विशेष आकर्षण आहे. अनेक प्रसिद्ध धार्मिक तीर्थस्थाने सोलापूर जिल्ह्यात आहे.दक्षिण भारताचे प्रवेशद्वार तसेच धार्मिक, सांस्कृतिक, कलानगरी म्हणून सोलापूर प्रसिद्ध आहे. येथील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी एकाच छताखाली आलेल्या पर्यटकांना दाखविण्यासाठी येथील उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी दिल्ली हाट च्या धर्तीवर सोलापुरातही सोलापूर हाट उभे करण्याची मागणी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना केली.

लोकसभा अधिवेशनातील शून्य काळात उपस्थित प्रश्नात खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी बोलताना पुढे म्हणाले कि, सोलापूर जिल्ह्यास कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा राज्याच्या सीमा लागतात. या तीनही राज्यातील अनेक नागरिक सोलापुरात स्थलांतरित झाले आहेत. तसेच दररोज हजारो पर्यटक सोलापूरला येतात. सोलापूर हि अध्यात्मिक, सांस्कृतिक, फलोत्पादन करणारा कृषी विकसित उद्योगनगरी असलेला जिल्हा आहे. शहर आणि जिल्ह्यात अनेक वस्तूंचे उत्पादन होते. त्याचप्रमाणे साहित्यिक, सांस्कृतिक, कला नागरी म्हणून सोलापूरची ख्याती आहे. या सर्व वैशिट्याची प्रदर्शनी, बाजारपेठ एकाच छताखाली पाहण्यासाठी दिल्ली हाट प्रमाणे सोलापुरातही “सोलापूर हाट”ची उभारणी करावी. त्याद्वारे सोलापूरच्या सर्व वैशिष्ट्यांची ओळख आलेल्या पर्यटकांना पाहता आल्यामुळे जगभरात होईल. या सोलापूर हाट साठी लागणारी जागा सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध होण्यासाठी सकारात्मक असल्याचेही खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी आश्वासित केले.

या सोलापूर हाट मध्ये सोलापूर शहरासह जिल्ह्यात बनविले जाणारे विविध खाद्य पदार्थ, पारंपरिक उत्पादित वस्तू, महिला बचत गटाच्या बनविल्या जाणाऱ्या वास्तू, हस्तकला, चित्रकारांची चित्रे, हातमागाच्या वस्तू, वस्त्रोद्योगातील उत्पादने, फळे, नाविन्यपूर्ण गोष्टी पाहता व खरेदी-विक्री करता येतील. एकूणच यामाध्यमातून आलेल्या पर्यटकांना आकर्षित करणारे मनोरंजन व रोजगाराभिमुख केंद्र म्हणून नावारूपास येईल. ज्यातून सोलापूरचा विकास होण्यास भर पडेल खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!