ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मंत्री आदिती तटकरेंची मोठी घोषणा : लाडक्या बहिणींना दिली आनंदाची बातमी !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. आत्तापर्यंत कोट्यावधी महिलांना 13 महिने पैसे मिळाले आहेत. मात्र ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप मिळाला नसल्याने महिला प्रतिक्षेत होत्या.

अखेर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. ऑगस्टचा हप्ता पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

आदिती तटकरे यांनी ट्वीट करत सांगितले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे.’ दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयानुसार लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तर, पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकरी महिलांना दरमहा 500 रुपये दिले जातात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!