ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आमदार कल्याणशेट्टी यांच्यावर आता आमदार निवास समितीची जबाबदारी !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

राज्यातील आमदार निवास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची निवड करण्यात आली आहे. मंगळवारी याबाबतची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात महाराष्ट्र विधिमंडळाच्या २०२४-२५ या कार्यकाळासाठी विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समित्यांची नियुक्ती ही मुख्यमंत्री फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजप विधिमंडळ मुख्य प्रतोद रणधीर सावरकर यांच्या संमतीने करण्यात आली आहे.

सध्या आमदार कल्याणशेट्टी यांच्याकडे सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष पद आहे. आता आमदार निवास व्यवस्थापन समिती  अशी दुहेरी जबाबदारी त्यांच्याकडे आली आहे.यामुळे अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.राज्यात आमदारांची संख्या मोठी आहे.त्यांच्या सुरक्षेबरोबरच  निवासाची व्यवस्था ही अत्यंत महत्त्वाची  असते आणि ही जबाबदारी खूप मोठी  असते.मुंबईत आकाशवाणी आमदार  निवास, मॅजेस्टिक आमदार निवास, जुने विधान भवन विस्तारीत आमदार निवास, मनोरा आमदार निवास मुंबई तसेच नागपूर येथील आमदार निवास अशा व्यवस्थेचा समावेश आहे. या ठिकाणी येणाऱ्या आमदारांची व्यवस्था आणि त्याबद्दलच्या तक्रारींचा निपटारा करणे या समितीचे मुख्य जबाबदारी आहे त्याशिवाय याठिकाणी असणाऱ्या आमदार महोदयांची आहार व्यवस्थेवर देखरेख करणे,खाद्यपेय प्रबंधकाची निवड करणे, उपाहारगृहातील खाद्यपेय पदार्थाचे दर ठरविणे, सदस्यांना उपाहारगृहात चांगले खाद्यपदार्थ तसेच चविष्ट, सकस व उत्कृष्ट प्रतीचे भोजन मिळेल याची दक्षता घेणे, उपाहारगृहात सदस्यांना असुविधा होणार  नाही.उपाहारगृहासंदर्भात किंवा निवासाबद्दल सदस्यांकडून आलेल्या तक्रारींची व सूचनांची दखल घेणे व कार्यवाही करणे यासारख्या बाबींची जबाबदारी या समितीवर असते. आमदार कल्याणशेट्टी यांच्याकडे पहिल्यांदाच ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!